आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आश्वासन

गौहत्ती (आसाम) – भाजप सरकार तिसर्यांदा सत्तेत आल्यास आसाममधून स्थलांतरितांना बाहेर काढण्याचा ‘अधिनियम, १९५०’ लागू केला जाईल. (या कायद्यामुळे जिल्हाधिकारी यांना २४ घंट्यांत अवैध स्थलांतरितांना हटवण्याचा अधिकार मिळतो) तसेच बांगलादेशी मियाँकडून (मुसलमानांकडून) झालेल्या अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि त्यांना भूमीचा एक इंचही तुकडा ठेवू दिला जाणार नाही. पुढील ५ वर्षांत आम्ही बांगलादेशी मियाँची कंबर मोडू, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिले.
🚨 Big Election Promise in Assam 🚨
"If re-elected, will bring a law to expel ‘Miya Muslims’ within 24 hours" – Himanta Biswa Sarma
⚡ He also vowed to “break the backbone of Miya Muslims in the next five years.”
⚖️ Key Highlights:
• 📜 Uniform Civil Code (UCC) to be… pic.twitter.com/sQzIYYKMlm— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
मुख्यमंत्री सरमा यांच्या ‘मियां मुसलमान’ या शब्दांवरून काँग्रेसने टीका केली आहे. ‘निवडणुकीत अशा प्रकारची भाषा लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे’, असे काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.
समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा !
भाजपच्या घोषणापत्रात समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरमा यांनी दावा केला की, सत्तेत आल्यानंतर ३ महिन्यांच्या आत ती लागू केली जाईल. सहाव्या अनुसूचीअंतर्गत येणार्या आदिवासी भागांना यातून वगळण्यात येईल. सरकारच्या मते, लव्ह जिहाद आणि भूमी जिहाद यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे.
‘पूरमुक्त आसाम’चे पुन्हा आश्वासन !
भाजपने पुढील ५ वर्षांत आसामला पूरमुक्त करण्याचा दावा पुन्हा केला आहे. यासाठी पहिल्या २ वर्षांत १८ सहस्र कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक