‘भारतातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्य पंथीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची भगवान बालाजीवर श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्याकडून देवस्थानचे पावित्र्य भंग होऊ शकते. त्यामुळे अशा कर्मचार्यांचा शोध घेऊन त्याना कामावरून काढण्यात यावे’, अशी मागणी ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’ने अनेक वेळा ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’कडे केली आहे; पण त्याविषयी अद्याप विशेष कार्यवाही झालेली नाही. याविषयी हिंदूंना जागृत करणारा लेख वाचकांसाठी देत आहोत.
• टीप : ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ हे आंध्रप्रदेशातील तिरुमला येथील व्यंकटेश्वर किंवा बालाजी मंदिराचे व्यवस्थापन पहाणारा स्वतंत्र ट्रस्ट आणि प्रशासकीय मंडळ आहे.

१. अन्य पंथीय कर्मचार्यांना काढण्याची ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’ची मागणी
‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्मध्ये (‘टीटीडी’मध्ये) अनुमाने २० टक्के कर्मचारी ख्रिस्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अशा कर्मचार्यांची ओळख पटवून त्यांना सेवेतून दूर करण्यात यावे, अशी मागणी ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’ने केली आहे. यासाठी फाऊंडेशनने गेल्या २० वर्षांत देवस्थानम्चे अधिकारी, राज्याचे देवस्थान विभागाचे मंत्री, मुख्यमंत्री आणि इतर संबंधित प्राधिकारी यांना अनेक पत्रे पाठवली. वर्ष २००७ मध्ये ‘फाऊंडेशन’ने शिकागो येथे आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस्. राजशेखर रेड्डी आणि करुणाकर रेड्डी यांची भेट घेतली, तसेच वर्ष २००८ मध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या उपस्थितीत चंद्रबाबू नायडू यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या सर्वांसमवेत झालेल्या बैठकांमध्ये ‘फाऊंडेशन’ने त्यांची मागणी लावून धरली, तसेच देवस्थानम्ला अनेक स्मरणपत्रे पाठवून या गोष्टीची वारंवार आठवण करून दिली.
२. ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्मधील ख्रिस्ती कर्मचार्यांची आकडेवारी सांगण्यास मंडळाची टाळाटाळ
अ. २३ डिसेंबर २०१९ या दिवशी ‘फाऊंडेशन’ने ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्चे कार्यकारी अधिकारी अनिल सिंघल यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे देवस्थानम्मध्ये अनुमाने २० टक्के कर्मचारी ख्रिस्ती आहेत, अशी शक्यता व्यक्त केली. त्या वेळी त्यांनी या आकडेवारीविषयी कोणतीही हरकत घेतली नाही.
आ. ऑगस्ट २०२० मध्ये ‘फाऊंडेशन’ने टेक्सासमधील (अमेरिका) फ्रिस्को येथील कार्यसिद्धि हनुमान मंदिरामध्ये देवस्थानम्चे तत्कालीन अध्यक्ष एस्.व्ही. सुब्बा रेड्डी यांची भेट घेतली आणि त्यांना देवस्थानम् मंडळात २० टक्के कर्मचारी ख्रिस्ती असल्याचा दावा करत चौकशी करण्याची विनंती केली. त्यांनीही या आकड्याला विरोध केला नाही.
इ. ‘फाऊंडेशन’ने आंध्रप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि देवस्थानम्चे अध्यक्ष बी.आर्. नायडू यांना अनेक पत्रे पाठवली अन् ‘देवस्थानम्मध्ये किती ख्रिस्ती कर्मचारी आहेत ?’, याची माहिती विचारली; परंतु त्याविषयी त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही, तसेच वरीलपैकी कुणीही देवस्थानम्मधील २० टक्के कर्मचारी ख्रिस्ती असल्याचा दावाही फेटाळला नाही.
३. शेकडो कर्मचार्यांपैकी केवळ ५० कर्मचार्यांना निलंबित करून कार्यवाही केल्याचा दिखावा
‘देवस्थानम्मध्ये केवळ हिंदूंनीच काम करावे आणि इतर धर्मीय कर्मचार्यांनी स्वेच्छेने इतर विभागात स्थानांतर करून घ्यावे’, असे आवाहन आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्य सचिव एल्.व्ही. सुब्रह्मण्यम्, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्चे अध्यक्ष बी.आर्. नायडू आणि कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव यांनी सार्वजनिकपणे केले. मागील वर्षभरात अनुमाने ५० कर्मचार्यांची ओळख पटवून त्यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली; परंतु संशयित ख्रिस्ती कर्मचार्यांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण १ टक्क्याहून न्यून दिसून येते.
४. देवस्थानम्मध्ये हिंदु नावांनी अनेक ख्रिस्ती कर्मचारी कार्यरत असण्याची शक्यता
‘देवस्थानम्च्या कर्मचार्यांमध्ये १ सहस्र अन्य धर्मीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची भगवान व्यंकटेश्वरावर श्रद्धा नाही, तसेच ते सनातन धर्माचे पालनही करत नाहीत’, असा आरोप १०.७.२०२५ या दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी केला.
अशा कर्मचार्यांची तातडीने चौकशी करून त्यांना कामावरून काढावे आणि त्या ठिकाणी केवळ हिंदूंनाच नोकरी द्यावी’, अशी मागणीही त्यांनी बी.आर्. नायडू यांच्याकडे केली.
माजी अध्यक्ष भुमा रेड्डी यांनी देवस्थानात १ सहस्र अन्य धर्मीय कर्मचारी असल्याच्या दाव्यावर टीका केली; परंतु तेथे किती ख्रिस्ती कर्मचारी आहेत, हे त्यांनी सांगण्याचे टाळले. देवस्थानम् मंडळाचे विद्यमान सदस्य भानू प्रकाश रेड्डी यांनी मंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘अन्य धर्मीय कर्मचार्यांची संख्या १ सहस्राहून अधिक असू शकते. काही कर्मचार्यांची नावे हिंदु असली, तरी त्यांच्या घरात इतर पंथांची चिन्हे दिसतात’, असे त्यांनी म्हटले, तसेच ‘त्या सर्व कर्मचार्यांच्या घरांमध्ये जाऊन पडताळणी करावी’, अशी मागणीही त्यांनी केली.
५. ख्रिस्ती कर्मचार्यांविषयी कार्यवाही न करण्यामागे राजकीय गणित !
देवस्थानम्चे सदस्य भानू प्रकाश रेड्डी यांनी सांगितले, ‘कंत्राटावर ठेवलेले, ‘आऊटसोर्स’ (बाह्य संस्थांद्वारे) आणि नियमित असे सर्व प्रकारचे मिळून अनुमाने २२ सहस्र कर्मचारी देवस्थानम्मध्ये कार्यरत आहेत. त्यांपैकी अनेक जण घरी अन्य पंथांचे पालन करतात. त्यामुळे अन्य पंथांचे पालन करणार्या कर्मचार्यांची माहिती मिळवण्यासाठी घराघरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यात यावे’, अशी सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिली आहे.
२२ सहस्र कर्मचार्यांच्या २० टक्के प्रमाणे ४ सहस्र ४०० कर्मचारी होतात. या कर्मचार्यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीसमोर किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर श्रद्धेची शपथ घेतल्याचेही नमूद करण्यात आले. हा आकडा चुकीचा असता, तर संबंधित अधिकार्यांनी त्याला विरोध केला असता. संबंधित अधिकार्यांना वास्तविक संख्या ठाऊक असूनही ती मान्य करण्यास ते सिद्ध नाहीत, असे वाटते. देवस्थानम्ने दडवून ठेवलेल्या ख्रिस्ती कर्मचार्यांची ओळख पटवण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न झाले नाहीत. प्रत्येक मुख्यमंत्री, देवस्थानम्चे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी यांना सहस्रो ख्रिस्ती कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आहे; परंतु राजकीय कारणांमुळे सखोल चौकशी होत नसल्याचे दिसून येते.
६. तिरुपती बालाजी देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक !
दशकानुदशके कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने तिरुपती बालाजी मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत आहे. ‘देवस्थानम्मध्ये केवळ हिंदूंनीच काम करावे’, असे देवस्थानम्चे अध्यक्ष सांगतात, तर मग ‘कर्मचार्यांचा पंथ पडताळण्याची प्रक्रिया का राबवली जात नाही ? तसेच अन्य पंथियांची संख्या उघड का केली जात नाही ?’, असे प्रश्न उपस्थित होतात. ‘देवस्थानातील भगवान व्यंकटेश्वराच्या पावित्र्याहून दडवलेल्या ख्रिस्ती कर्मचार्यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे का ?’, असा प्रश्नही भाविकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
– ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन, आंध्रप्रदेश (२०.३.२०२६)
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?