होय, हा देश आमच्या तीर्थरूपांचा आहे !

उत्तरप्रदेशमधील संभल येथील पोलीस अधिकारी कुलदीप कुमार यांनी इराणसमर्थक मुसलमानांना ‘इराणविषयी प्रेम असेल, तर तिथे जाऊन त्याला पाठिंबा द्या !’, असे उद्गार काढताच ‘ए.आय.एम्.आय.एम्.’(ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)चे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी ‘हा देश कुणाच्या बापाचा नाही !’, असे उद्गार काढले. त्यानंतर त्यांनी ‘हा देश राज्यघटनेद्वारे चालणार कि कुणाच्या बोलण्याने ?’, असा प्रश्न उपस्थित केला.

१. …या प्रश्नांची उत्तरे असदुद्दीन ओवैसी देतील का ?

असदुद्दीन ओवैसी हे स्वतः कायदेतज्ञ आहेत. राज्यघटनेचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात. ते पुढीलप्रमाणे :

अ. ‘राज्यघटनेतील कोणत्या कलमात परकीय देशाशी निष्ठा बाळगली, तरी चालेल’, असे सांगितले आहे.

आ. ‘१५ मिनिटे पोलिसांना बाजूला करा आणि हिंदूंना नष्ट करू’, अशा आशयाचे उद्गार ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी काढले होते. त्याविषयी त्यांनी ‘राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले हे उद्गार आहेत का ? असे उद्गार काढतांना हा देश कुणाच्या तीर्थरूपांचा होता ? राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अशा प्रकारचा हिंसात्मक विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे ?’, या ३ प्रश्नांची उत्तरे  द्यावीत.

श्री. दुर्गेश परुळकर

इ. काश्मीरमधील हिंदु पंडित या देशाचे अधिकृत नागरिक असूनसुद्धा जेव्हा त्यांना पळवून लावण्यात आले. त्या वेळी असदुद्दीन ओवैसी यांनी काश्मीरमधील धर्मांध मुसलमानांना ‘हा देश तुमच्या बापाचा नाही’, असे ठणकावून का सांगितले नाही ? त्या वेळी त्यांना हा देश राज्यघटनेच्या आधारे चालवला जातो. हे लक्षात आले नव्हते का ? ‘राज्यघटनेचा वापर केवळ मुसलमानांच्या स्वार्थासाठीच करायचा असतो’, असा संदेश ओवैसी यांना त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून द्यायचा आहे का ? ते त्यांनी स्पष्ट करावे.

ई. ‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला’, (भारत तुझे तुकडे होतील इन्शाल्ला इन्शाल्ला) अशा राष्ट्रद्रोही घोषणांनी या देशातील आसमंत दणाणून जातो. त्या वेळी ‘या घोषणा देणार्‍यांच्या बापाचा हा देश आहे का ?’, असा प्रश्न ओवैसी यांनी का विचारला नाही ?

उ. ‘देशाचे तुकडे करण्याची इच्छा घोषणेद्वारे सार्वजनिक ठिकाणी देण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने दिले आहे ?’, हे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगावे.

ऊ. हिंदूंना त्यांचा सण आणि उत्सव साजरा करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला असतांनासुद्धा मुसलमान समाज हिंदूंना सुखाने त्यांचे सण-उत्सव साजरे करू देत नाहीत. अशा वेळी हा देश कुणाच्या तीर्थरूपांचा असतो ?

ए. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याचा अधिकार राज्यघटनेने कोणत्या कलमाद्वारे मुसलमान समाजाला दिला आहे ? यावर ओवैसी यांनी प्रकाश टाकावा. अशा घोषणा जेव्हा दिल्या जातात, त्या वेळी असदुद्दीन ओवैसी अशा घोषणा देणार्‍यांना का प्रश्न विचारत नाहीत, ‘हा देश तुमच्या बापाचा आहे का ?’

२. परकीय देशाची बाजू घेऊन फितुरी करणे, हा दंडनीय अपराध !

या राष्ट्राच्या रक्षणार्थ, तसेच देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी म्हणून शपथबद्ध असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍याने केलेले विधान हे त्या प्रशासकीय अधिकार्‍याला देण्यात आलेल्या राज्यघटनात्मक अधिकाराचा प्रामाणिकपणे केलेला उपयोग आहे. अशा परिस्थितीत एखाद्या अधिकार्‍याने स्वतःची राष्ट्रनिष्ठा वा कर्तव्यनिष्ठा व्यक्त करणे चुकीचे आहे. खरेतर ‘परकीय देशाची बाजू घेऊन उघडपणे फितुरी करत आहोत’, असे सांगणे हा दंडनीय अपराध आहे. हे कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांना ठाऊक नाही, असे म्हणण्याचे धाडस करता येत नाही.

३. मुसलमान वस्तीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून त्यांची जयंती साजरी करून दाखवणार का ?

खरे पहाता हा देश आम्हा हिंदूंच्या तीर्थरूपांचा आहे. वास्तविक असे उत्तर देण्यास आमची बुद्धी आम्हाला अनुमती देत नाही. तथापि जर कुणी आमच्या तीर्थरूपांचा उल्लेख केला तर आता ठणकावून सांगणे, हे आमचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य ठरते.

‘होय, हा देश आमच्या तीर्थरूपांचा आहे.’ या देशाची संस्कृती हिंदु संस्कृती आणि देशाचा धर्म सनातन धर्म आहे. इस्लामची प्रस्थापना झालेली नव्हती, तेव्हापासून हा देश अस्तित्वात आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला, तर या गोष्टी स्पष्टपणे उघड होतील. तेवढे कष्ट असदुद्दीन ओवैसी यांनी घ्यावेत. त्या सत्याला त्यांनी सामोरे जाण्याचे धैर्य दाखवावे. हा देश प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुसलमान होते’, असे सांगितले जाते. असदुद्दीन ओवैसी यांना हे मान्य असेल, तर त्यांनी मुसलमान वस्तीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारून त्यांची जयंती उत्साहाने साजरी करून दाखवावी. ‘देशाच्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान बाळगा’, असे राज्यघटना सांगते. त्या राज्यघटनेचाही त्यांनी मान राखावा; कारण ‘हा देश राज्यघटनेवर चालतो’, यावर ओवैसी यांचा विश्वास आहे.  कायदे पंडित आणि घटनातज्ञ असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्यासाठी एवढ्या गोष्टी सांगणे पर्याप्त आहेत, असे वाटते.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (१६.३.२०२६)

संपादकीय भूमिका

घुसखोर जेव्हा हुतात्मा स्मारकाला लाथाडतात, तेव्हा त्यांच्या बाजूने लढा देणारे राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली लढा देतात ?