खामेनी ठार झाल्याची बातमी प्रसारित केल्यामुळे जिहाद्यांचे आक्रमण

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील गंगावती शहरात इस्लामी कट्टरतावाद्यांनी सुका मेव्याचा व्यापार करणारे चंद्रशेखर यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. इराणचे सर्वोच्च नेते प्रमुख आयातुल्ला खामेनी हे अमेरिका आणि इस्रायल यांच्या आक्रमणात ठार झाल्याची बातमी चंद्रशेखर यांनी त्यांच्या ‘इंस्ट्राग्राम’ खात्याद्वारे प्रसारित केली होती. त्यामुळे इस्लामी कट्टरतावाद्यांनी त्यांच्यावर आक्रमण केल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून हिंदु संघटनांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
Gangavathi (Karnataka): Hindu businessman brutally attacked by Jihadis for sharing Instagram status on Ali Khamenei’s death
The reality is widely known, yet instead of accepting it, radicals chose violence against a Hindu who shared the news.
This clearly shows that such… https://t.co/8qPIlT46vF pic.twitter.com/OsEasHZWdv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 4, 2026
१. चंद्रशेखर यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार ते दुकानात काम करत असतांना ५ ते ६ इस्लामी कट्टरतावादी तेथे आले. त्यांनी चंद्रशेखर यांना घेरले आणि इंस्टाग्रामवर बातमी प्रसारित केल्यावरून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी चंद्रशेखर यांना मारहाण केली.
२. ‘आक्रमणकर्त्यांनी मला केवळ मारहाणच केली नाही, तर माझ्या घरात घुसून मला आणि माझ्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकीही दिली’, असे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
३. चंद्रशेखर यांनी रात्री गंगावती टाऊन पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली.
४. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. दुकानाजवळील सीसीटीव्ही चित्रफितींची पडताळणी करून आक्रमणकर्त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बातमी सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केल्यामुळे झालेला हा हिंसक प्रकार अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर आघात आहे.
संपादकीय भूमिकाखामेनी ठार झाल्याचे उघड सत्य असतांना ते प्रसारित करणार्या हिंदूवर जिहादी आक्रमण करतात, यावरून त्यांना हिंदूंवर आक्रमण करण्याची संधी हवी असते, हे लक्षात येते. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे ! |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले