|

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – शबरीमला मंदिरातील सोने चोरी प्रकरणात पुरोहित (तंत्री) कंदारारू राजीवरू यांना ४१ दिवस कारावासात राहिल्यानंतर जामीन संमत करण्यात आला. कोल्लम दक्षता न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात तंत्रींचा किंचितही संबंध असल्याचा पुरावा नाही. विशेष अन्वेषण पथकाने सादर केलेले पुरावे न्यायालयाने नाकारले असून पथक उच्च न्यायालयात जाण्याच्या सिद्धतेत आहे.
🚩 Sabarimala Gold Row Update
Hereditary Tantri Kandararu Rajeevaru granted bail in the alleged gold theft case.
The Court clarifies – no evidence found against him.
Serious questions now arise: Was this an attempt by Kerala’s Communist govt to frame the priest?
Hindus feel… https://t.co/k2l8MbasUo pic.twitter.com/EsJopOSame
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 26, 2026
तंत्रींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
तंत्रींच्या अटकेला प्रारंभापासून विरोध झाला. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर राजकीय हेतूने कारवाई केल्याचा आरोप केला. पूर्व आणि विद्यमान देवस्वम मंत्र्यांना अन् त्रावणकोर देवस्वम मंडळाच्या अध्यक्षांना वाचवण्यासाठी तंत्रींना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले गेले.
सूड उगवण्याची कारवाई असल्याचा दावा
तंत्रींनी सांगितले की, मंदिराच्या परंपरा आणि विधी यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्या प्रवेशाविषयी कठोर भूमिका घेतली होती. राजकीय हस्तक्षेप नाकारला आणि परंपरेत हस्तक्षेप झाल्यास पूजा न करण्याची चेतावणी दिली होती. मंदिर प्रतिदिन उघडण्यालाही त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे प्रभावशाली घटक अप्रसन्न झाले आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी मला आर्थिक गैरव्यवहारात गोवण्याचा प्रयत्न झाला. मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी याच्याशी तंत्रींचा संबंध जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
न्यायालयाने आरोप फेटाळले
१८ जून २०१९ या दिवशी मंदिराच्या प्रवेशद्वारावरील मूर्ती आणि आवरण यांवरील सोन्याच्या पत्र्याच्या दुरुस्तीसाठी तंत्रींची शिफारस असल्याचा दावा विशेष अन्वेषण पथकाने केला; मात्र नोंदीत तसे काहीही नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. २० जुलै २०१९ आणि १८ मे २०१९ च्या प्रस्तावांवर तंत्रींची स्वाक्षरी नसल्याचेही नमूद करण्यात आले. १० जुलै २०१९ च्या प्रस्तावावर स्वाक्षरी ही मंडळाने मागितलेल्या अभिप्रायापुरतीच असल्याचे न्यायालयाने म्हटले. नियमांनुसार तंत्रींचे दायित्व केवळ पूजा आणि धार्मिक विधी यांपुरते मर्यादित असून देखभालीचे दायित्व त्रावणकोर देवस्वम मंडळाच्या अधिकार्यांचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
तंत्रींविरुद्ध पुरावा नसतांनाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्य सचिव एम्. व्ही. गोविंदन् यांनी त्यांना ‘प्रमुख चोर’ असे संबोधले. दुसरीकडे ‘अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी का केली नाही ?’, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात माजी आमदार ए. पद्मकुमार यांच्यासह ३ जण आणि मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी यांना अटक झाली आहे.
मार्च २०१९ मध्ये सोन्याचे दागिने वितळवण्याचे काम संबंधित त्रावणकोर देवस्वम अध्यक्षांच्या माहितीत आणि संमतीने झाल्याचे सांगितले जाते. पुढे ते सोने गायब झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात राजकीय वाद तीव्र झाला असून तंत्रींची अटक ही मूळ घटनेपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकापुरोहितांना गोवणार्यांवर कारवाई करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते ! |
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !