स्वामी विवेकानंद यांची शिकवण

जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद यांची शिकवण १. प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. २. मत्सर आणि अहंकार यांचा … Read more

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.

स्वार्थी आणि निःस्वार्थी यांच्यातील आध्यात्मिक भेद

‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.

दुसर्‍यांसाठी सतत कार्यरत रहावे !

शक्ती आणि अन्य आवश्यक गोष्टी आपोआपच प्राप्त होतील. तुम्ही कामाला लागा, म्हणजे तुम्हाला दिसून येईल की, तुमच्यात इतकी शक्ती उत्पन्न होत आहे की, ती सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. दुसर्‍यांसाठी केलेले अत्यंत लहानसे कामही …

ध्येयाप्रत कार्यरत रहाणे महत्त्वाचे !

घरोघर जाऊन ईशप्राप्तीच्या ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. आपल्या देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत.

सत्याचे अनुसरण करण्याचे महत्त्व !

सत्य हे असत्याहून अनंतपटींनी प्रभावशाली आहे. चांगुलपणा हा वाईटपणाहून अनंतपटींने प्रभावशाली आहे. जर सत्य आणि चांगुलपणा ही दोन्ही तुमच्या ठायी असतील, तर ती केवळ आपल्या प्रभावानेच आपला मार्ग सिद्ध करून घेतील.

कठीण प्रसंगातही सत्याचे अनुसरण करणे महत्त्वाचे !

पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते..

सत्याचे अखंड पालन करण्याचे महत्त्व !

धीर व्हा, साहसी व्हा. माझ्या संतानांनी (मुलांनी) प्रथम वीर बनले पाहिजे. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडीही तडजोड करू नका.

मनुष्यजन्माचे महत्त्व

तुम्ही जन्माला आलाच आहात, तेव्हा जगात काहीतरी खूण सोडून जा किंवा काहीतरी महत्त्वाचे कार्य करून जा. नाही तर तुम्ही, वृक्ष आणि पाषाण यांत काय भेद आहे ? तीही अस्तित्वात येतात, झिजतात आणि शेवटी नष्ट होतात.