स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !
तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.
तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.
सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्यांची हानी आणि त्यांचे अनिष्ट करतो.
माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे…
सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचेच सतत चिंतन करत बसणे, हा दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे, हाच उपाय आहे.
भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो.
पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.
दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.
आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही.
तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.
केवळ स्वतः इच्छा केल्याने कुणी काही मोठा होत नाही, तर सर्वकाही भगवंताच्या इच्छेने घडत असते. त्याला ज्याला वर आणायचे असते, तोच वर येतो आणि ज्याला खाली आणायचे असते, तो खाली येतो.