स्वामी विवेकानंद यांची शिकवण
शक्ती आणि अन्य आवश्यक गोष्टी आपोआपच प्राप्त होतील. तुम्ही कामाला लागा, म्हणजे तुम्हाला दिसून येईल की, तुमच्यात इतकी शक्ती उत्पन्न होत आहे की, ती सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. दुसर्यांसाठी केलेले अत्यंत लहानसे कामही अंतःस्थ शक्ती जागृत करते. दुसर्याच्या हिताचा अत्यंत थोडा विचार केल्यानेही हृदयात सिंहाचे बळ संचारते. माझे तुम्हा सर्वांवर उत्कट प्रेम आहे. ‘दुसर्यांसाठी कार्य करता करता तुम्हाला मृत्यू यावा’, अशी माझी हार्दिक इच्छा आहे. तुम्हाला तसे करतांना पाहून मला आनंदच होईल.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)