स्वामी विवेकानंद यांची शिकवण
१. प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत.
२. मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करा. दुसर्यांसाठी एकोप्याने काम करण्यास शिका. आपल्या देशाला याचीच मोठी आवश्यकता आहे.
३. आपण जगाचे भले करू शकतो का ? निरपेक्ष सत्याच्या दृष्टीने पाहिल्यास ‘नाही’ आणि सापेक्ष दृष्टीने पाहिल्यास ‘होय’, हेच या प्रश्नाचे उत्तर आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)