सत्याचे अखंड पालन करण्याचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

धीर व्हा, साहसी व्हा. माझ्या संतानांनी (मुलांनी) प्रथम वीर बनले पाहिजे. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडीही तडजोड करू नका. नाना प्रकारची प्रलोभने समोर असूनही जर तुम्ही सत्याला चिकटून रहाल, तर तुमच्या ठायी अशी दैवीशक्ती उत्पन्न होईल की, जिच्यासमोर तुम्ही ज्या गोष्टी सत्य मानत नाही, त्यांच्यासंबंधी तुमच्याशी बोलण्यास लोकांना भय वाटेल. सतत १४ वर्षे तुम्ही जर कठोरपणे सत्याचे अखंड पालन करू शकला, तर तुम्ही जे काही म्हणाल, त्यावर लोक पक्का विश्वास ठेवतील.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)