दान हा श्रेष्ठ गुण !

आपल्या जवळचे अन्न दुसर्‍याला देऊन तुम्ही स्वतः भुकेने मेला, तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त होऊन जाल. त्याच क्षणी तुम्ही पूर्ण होऊन जाल. ईश्वर होऊन जाल.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण !

कोणत्याही धर्मसंप्रदायाचे पतन त्याच दिवशी चालू होते, ज्या दिवशी त्यात धनिकांची पूजा चालू होते.

भारत आणि पाश्चात्त्य देश यांचा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकन स्त्रीला उत्तर दिले, ‘‘तुमच्याकडे केवळ आई सोडून इतर स्त्रियांना पत्नीसमान मानले जाते, तर भारतात केवळ पत्नी वगळता इतर स्त्रियांना मातेसमान मानले जाते.’’

निरपेक्षता

अगदी निरपेक्ष रहा, तसेच परत फेडीचीही आशा बाळगू नका. तुम्हाला जे काय द्यावयाचे असेल, ते द्या. ते तुम्हाला परत मिळेलच; पण त्याचा सध्या विचारही करू नका. कितीतरी पटीने नव्हे, सहस्रो पटींनी ते तुम्हाला परत मिळेल; पण त्यावरच तुमचे लक्ष असता कामा नये.             

स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे.

स्‍वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्‍यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.

धर्म आणि अधर्म यांची व्याख्या

जे काही प्रगतीत अडथळा निर्माण करते वा जे काही अधःपतनाला साहाय्य करते, तो अधर्म आणि जे काही आपल्याला उन्नत होण्यास अन् आपल्या व्यक्तीत्त्वाच्या विभिन्न अंगामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास साहाय्य करते, तो धर्म होय.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…

कोणतेही कार्य क्षुद्र नाही !

हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्खही ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धीमान तोच की, जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. कोणतेही कार्य क्षुद्र नाही, हे ध्यानात ठेवा.