स्वामी विवेकानंद यांची शिकवण
सत्य हे असत्याहून अनंतपटींनी प्रभावशाली आहे. चांगुलपणा हा वाईटपणाहून अनंतपटींने प्रभावशाली आहे. जर सत्य आणि चांगुलपणा ही दोन्ही तुमच्या ठायी असतील, तर ती केवळ आपल्या प्रभावानेच आपला मार्ग सिद्ध करून घेतील.
सत्याचे अनुसरण करा. मग ते तुम्हाला कुठेही घेऊन जावो, प्रत्येक विचार हा त्यातून निघणार्या अंतिम तर्कसंगत निष्कर्षाप्रत पोचू द्या. भित्रे आणि दांभिक बनू नका.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)