सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे काम बंद पडू दिले जाणार नाही ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री, सातारा

जलसंपदाच्या करारतत्त्वावरील जागेत रहाणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. त्यानंतरही कुणी काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

वर्ष १९२५ मध्ये ब्रिटीश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता.

पंढरपूर येथे विकासाचा सुधारित आराखडा सिद्ध करण्यासाठी ड्रोन छायाचित्रकाद्वारे चित्रीकरण !

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्याच्या कामांचा सुधारित सर्वंकष आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.

श्रीरामपूर (नगर) येथील लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटर टोळीवर मकोका कारवाई !

येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटर याच्यासह ६ जणांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.

येळावीत (जिल्हा सांगली) श्री दुर्गामाता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

दौडीसाठी १ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होती, तसेच दौडीत युवती-माता भगिनी, लहान मुले यांचा सहभाग होता. दौडीची सांगता हनुमान मंदिर येथे झाली.

नाशिक येथे सैन्यातील मेजर आणि अभियंता यांना लाच घेतांना पकडले !

नाशिक येथील ‘कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या परिसरात मेजर आणि साहाय्यक गिअर्सन इंजिनियर हिमांशू मिश्रा अन् कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एका कंत्राटदाराकडून लाच घतांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या) पथकाने पकडले.

शहापूर (ठाणे) येथे पोलीस उपनिरीक्षकांकडून गोरक्षकांना शिवीगाळ आणि आक्रमण !

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रानविहीर घाटामध्ये जनावरांची वाहतूक करणारा टेंपो गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने  पकडला होता, तर एक टेंपो निघून गेला. या कारवाईविषयी चौकशी करण्यासाठी गेलेले गोरक्षक नरेश गोडांबे यांना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार यांनी शिवीगाळ…

भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला ! – अरविंद सावंत, खासदार

भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी वाशी येथे केले. शिवसेना प्रबोधन यात्रेनिमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील शिवसैनिकांच्या मोळाव्यात ते बोलत होते.

‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा’ या मागणीसाठी विश्व हिंदु परिषदेची स्वाक्षरी मोहीम !

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, संपूर्ण देशभरात एकच गोहत्या बंदी कायदा कठोरपणे लागू करा, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अधिकाधिक कठोर करा, गोरक्षकांच्या संरक्षणासाठी आणि गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही होण्यासाठी…

पुणे येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांची थकित वीजदेयके भरा !

कोट्यवधी रुपयांची देयके थकित का रहातात ? थकित वीजदेयके भरण्यासाठी आदेश का द्यावे लागतात ? ती वेळोवेळी का भरली जात नाहीत ? हेही पहायला हवे !