येळावीत (जिल्हा सांगली) श्री दुर्गामाता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री दुर्गामाता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येळावी (जिल्हा सांगली) – तासगाव तालुक्यातील येळावी गावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येत असलेल्या श्री दुर्गामाता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौडीसाठी १ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होती, तसेच दौडीत युवती-माता भगिनी, लहान मुले यांचा सहभाग होता. दौडीची सांगता हनुमान मंदिर येथे झाली.

१. येळावी गावात गेली २२ वर्षे दौड चालू असून यंदाही पहाटे ५.३० वाजता मारुति मंदिरात श्री दुर्गादेवीची आरती करून दौडीला प्रारंभ केला जात असे. यात लहान मुलांपासून सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी होत.

दौडीत सहभागी नागरिक, धारकरी, मुले

२. दौडीत सहभागी होतांना पारंपरिक वेषभूषा करून, टोपी परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत प्रतिदिन विविध मार्गांवरून जाणार्‍या दौडीचे त्या त्या भागातील महिला रांगोळी काढून, ध्वजपूजन करून स्वागत करत.

३. दौडीच्या निमित्ताने धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या. दीपावलीमध्ये किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दौडीमुळे गावातील वातावरण हिंदुत्वमय झाले होते.