सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याची समस्या गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस वीजपुरवठ्यात सातत्याने पालट होत असून कधी अल्प, तर कधी उच्च दाबाचा वीजपुरवठा होत आहे. सातत्याने पालटणार्‍या या विजेच्या दाबामुळे विजेच्या उपकरणांची हानी होत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईत उपस्थित !

विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांच्यामुळे ‘नागोठणे’ची ओळख संपूर्ण जगात होईल, हे आमचे भाग्य ! – किशोरशेठ जैन, संपर्कप्रमुख, शिवसेना, रायगड

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा येथे जन्म झाला, ही आम्हा नागोठणेवासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. येथील मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. जयंत आठवले’ यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये आला, तेव्हा सर्व ग्रामस्थांनी त्याला एकमताने मान्यता दिली.

सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल – उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी कि नाही, हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता !

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्‍पष्‍ट केले आहे.

येत्‍या आठवडाभरात संजय राऊत राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेश करतील ! – आमदार नीतेश राणे, भाजप

उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्‍याने संजय राऊत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या वाटेवर आहेत. येत्‍या आठवड्यात ते राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेश करतील.

पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे शमवण्यासाठी शरद पवार यांनी केलेले नाटक होते ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

शरद पवार यांनी त्यांच्या त्यागपत्राचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘राष्ट्रवादी नाट्य’ संबोधले आहे.

कोल्हापूर येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा पार पडला !

संध्यामठ, छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा ३ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला.

चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उन्हाळा न्यून होईपर्यंत केली थंडगार पाण्याची व्यवस्था

हा  उपक्रम हा पर्यावरणपूरक असून कागदी ग्लासमधून या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थीही स्वतःच्या बाटलीमधूनही हे पाणी भरून घेऊ शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

६ मे या दिवशी तेलशुद्धीकरण प्रकल्प होण्यासाठी युतीचा मोर्चा : उद्धव ठाकरे आंदोलकांना भेटण्यासाठी बारसूत येणार

राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सूत्रावरून राजकारण तापत आहे. काही प्रकल्प समर्थकही ठाकरे यांची भेट घेणार आहेत.