सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल – उद्धव ठाकरे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी कि नाही, हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवे. राज्यपाल यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असला, तरी पक्षादेश हा त्या वेळची शिवसेना म्हणजे माझी शिवसेना यांच्याकडेच राहील. अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. मी माझ्या पदाचे त्यागपत्र दिले, त्याप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यागपत्र देऊन निवडणुकीला सामोरे जावे.’