काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

कोरोनामुळे राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ! – प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात शाळांची गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा !

या कार्यशाळेत पालटत्या काळानुसार शिक्षकांना अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक काळात अध्यापन कसे करावे ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन शिक्षकांना या कार्यशाळेतून करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळा १५ जूनला चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, १३ जून या दिवशी केवळ पहिलीच्या शाळांसाठी ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम होणार आहे. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल.

शाळेमध्ये शिक्षकांच्या भ्रमणभाष वापरावर निर्बंध !

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना संसर्गाच्या काळातील मुलांची शैक्षणिक हानी भरून काढावी यांसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याची धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन !

ख्रिस्ती मुलांना बायबल शिकवले जाणे, एकवेळ समजता येईल; मात्र त्याच शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांनाही बायबल शिकण्याची सक्ती करणे, ही धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – हिंदु जनजागृती समिती

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ३८ अनधिकृत शाळा !

इतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

आसाममधील ‘सरकारी’ मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, आसाम सरकारचा मदरशांच्या संदर्भातील निर्णय हा राज्यघटनेतील २५, २६, २८ आणि ३० या कलमांचे उल्लंघन करतो.

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा !

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी, कागल आणि पेठवडगाव येथे देण्यात आले.

मुंबईतील २६९ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे पालिकेकडून आवाहन !

मुंबईमध्ये २६९ शाळा अनधिकृत असून पालकांनी तेथे मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांची सूची महापालिकेने संकेतस्थळावर ठेवली आहे. अनधिकृत शाळांवर बंदी घालण्यासह त्यांच्याकडून आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे.