पालखी प्रस्‍थानानंतर देहूमध्‍ये स्‍वच्‍छता कर्मचार्‍यांनी केली त्‍वरित स्‍वच्‍छता !

संत तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान ११ जून या दिवशी येथून झाल्‍यानंतर गावातील कचर्‍याची त्‍वरित स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या वेळी १४ टन ओला कचरा, तर ६५० किलो प्‍लास्‍टिक कचरा जमा करण्‍यात आला.

श्री विठ्ठल नामाच्‍या जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे पुणे शहरात आगमन !

पंढरपूरकडे निघालेल्‍या संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे पुणे येथे १२ जून या दिवशी सायंकाळी आगमन झाले.

हरिनामाच्‍या अखंड जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांच्‍या पालखीचे पंढरपूरच्‍या दिशेने प्रस्‍थान !

वारकर्‍यांच्‍या टाळ मृदुंगाच्‍या गजरात ११ जून या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान सोहळा पार पडला. इंद्रायणीच्‍या काठावर सहस्रों वारकरी आलेे होते.

पालखीच्‍या स्‍वागतासाठी हडपसरनगरी सज्‍ज

पुणे शहरातील सोहळ्‍याचा हा अखेरचा टप्‍पा असल्‍यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या सोहळ्‍याच्‍या स्‍वागतासाठी हडपसर परिसर सज्‍ज झाला असून प्रशासनाकडून वारकर्‍यांसाठी विविध सोयीसुविधांचे नियोजन केले जात आहे.

संत एकनाथ महाराजांची पालखी दादेगाव येथील गावकर्‍यांनी अडवली !

संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्‍त्‍याची दुरवस्‍था पहाता यंदा मार्गात काही प्रमाणात पालट करण्‍यात आले आहेत; मात्र प्रतिवर्षी ज्‍या गावातून ही पालखी जाते, त्‍या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्‍य नाही. त्‍यामुळेच पालखी अडवण्‍यात आल्‍याची माहिती मिळत आहे

आळंदीत पोलिसांकडून वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार !

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखी सोहळ्‍याचे ११ जून या दिवशी आळंदीमधून सायंकाळी प्रस्‍थान झाले; मात्र त्‍यापूर्वी मंदिर व्‍यवस्‍थापनाने घेतलेल्‍या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलीस यांमध्‍ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार केला.

अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

पुणे येथे वारी सोहळ्‍यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त !

देहू येथून १० जून या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान होणार आहे.

पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्‍याची भाविक आणि नागरिक यांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना दिसत नाही का ? पालखी मार्ग कायमचाच चांगला रहाण्‍यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.