संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ११ जून या दिवशी होणार !

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून ११ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चंदन उटीचा वापर करत शिंदेशाही साज !

आळंदी संस्थानच्या वतीने ही प्रथा परंपरा जपली जात असून पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी ही उटी साकारली. या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदेशाही अवतार पहाण्यासाठी माऊली भक्तांनी गर्दी केली होती.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत. हा भक्तीमार्ग उत्कृष्ट असावा. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.

यंदा माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष !

यंदा रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष असल्याने उपस्थित दिंडी प्रमुख आणि पालखी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अधिकाधिक भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

घराला सनातनचा आश्रम बनवणारे आणि घरासमोरील जागेत ‘राम कृष्ण हरि’, या आकारात फुलझाडे लावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नंदिहळ्ळी (बेळगाव) येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) !

‘प्रत्येक साधकाचे घर हे सनातनचा आश्रमच झाला पाहिजे.’ तसे आम्ही प्रयत्न करतो.

संतश्रेष्ठ ज्ञानदेव बैसले समाधी !

श्री विठ्ठलाने ज्ञानेश्वरांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात हार घातला. समाधीस्थानात शिरण्यावेळी श्री विठ्ठलाने त्यांना प्रेमाने हात देत आत नेले. श्री ज्ञानदेव आसनावर स्थिर झाले आणि करकमले जोडून त्यांनी नेत्र मिटले. यानंतर सर्व संतांनी समाधीच्या गुहेस शिळा लावून नंतर पुष्पवृष्टी केली.

आळंदीमध्ये कार्तिकी यात्रा आणि ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा यांची प्रशासनाकडून सिद्धता !

२० नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) आणि २२ नोव्हेंबर या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे.

गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली !

‘शके १५०६ च्या भाद्रपद कृष्ण षष्ठी या दिवशी एकनाथ महाराजांनी संत ज्ञानदेवांच्या सूचनेवरून ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत शुद्ध करून तिचा प्रसार सुलभ केला. त्यासंदर्भातील लेख आज असलेल्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.