कलियुगात सनातनच्या साधकांसाठी असलेला संधीकाळ

‘कलियुगामध्ये परात्पर गुरुदेवांचे (डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे) अवतारी तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साधकांनी याचा लाभ करून घ्यायला हवा. कलियुगात साधनेचा ‘संधीकाळ’ म्हणतात, तो हाच आहे.’

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते.

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालवता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, ते ‘गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ?’ ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.                      

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्‍वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.

गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक

‘गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे. 

गुरूंच्या निर्गुण आणि सगुण रूपांची सेवा

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे. 

गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.