कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी द्यावे ?

पावसाळ्यामध्ये पाणी देण्यावर आपले नियंत्रण नसते; परंतु अन्य ऋतूंमध्ये पुष्कळ वेळा झाडांच्या मुळांना आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात दिलेले पाणी, हे रोपे मरून जाण्याचे कारण असते.

तण काढून टाकून भूमी स्वच्छ करू नका !

तणाची मुख्य पिकासमवेत मातीतील अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा होत नाही; उलट तण सजीव आच्छादनाचे कार्य करते. तणाची उंची अधिक झाल्यास त्याची छाटणी करून त्याच ठिकाणी आच्छादन म्हणून पसरून घालावे.

वांगी, मिरची आणि टोमॅटो यांसारखे लहान बी लावतांना कोणती काळजी घ्यावी ?

‘वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवर यांचे बी पुष्कळ लहान असते. त्यामुळे ते थेट कुंडी किंवा वाफा यांमध्ये लावू नये. त्या आधी त्यांची रोपे सिद्ध करून घ्यावीत.

‘सापळा पीक’ म्हणजे काय ?

अशा प्रकारे लागवड केल्याने कीड दुसर्‍या पिकाकडे आकर्षित होते आणि मुख्य पिकाचे रक्षण होते. मोहरी आणि चवळी ही सापळा (Trap) पिकाची उदाहरणे आहेत.

झेंडूच्या रोपांची लागवड करण्याचे महत्त्व

काही वेळा वांगी, कोबी अशा भाज्यांच्या मुळांवर लहान गाठी दिसतात. या सूत्रकृमींच्या गाठी असतात. हे कृमी भाज्यांच्या मुळांतून रस शोषून रोपाला हानी पोचवतात. या कृमींचा नाश करणारे १ औषधीतत्त्व झेंडूच्या मुळांमधून स्रवते आणि सूत्रकृमींचे नियंत्रण करते.

शेतकर्‍याचे कष्ट लक्षात येण्यासाठी एकदा तरी घरी लागवड करून पहा !

‘शेतकरी शेतात किती परिश्रम करत असेल ?’, याची कल्पना येऊन प्रतिदिन ताटात वाढल्या जाणार्‍या अन्नाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. आपोआपच आपल्याकडून अन्न वाया घालवले जात नाही !’

नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

‘नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न अधिक येत नाही. असा अपप्रचार आणि त्याचे केलेले खंडण !

विदेशी गांडुळापासून बनवलेले गांडूळ खत वापरू नका !

विदेशी गांडुळांच्या विष्ठेत पारा, शिसे यांसारखे विषारी धातूंचे अंश असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे विषारी अंश गांडूळ खतावर पिकवलेल्या पिकांच्या माध्यमातून मानवी शरिरात प्रवेश करू शकतात. यामुळे विदेशी गांडुळांपासून बनवलेले गांडूळ खत वापरणे धोकादायक आहे.

लागवड करतांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही, तरी निराश होऊ नये !

‘भाजीपाला लागवड करतांना काही वेळा पहिल्याच प्रयत्नात यश आले नाही,’ असे होऊ शकते. अशा वेळी निराश न होता ‘आपले काही चुकले आहे का ?’, हे शोधावे.

ह्यूमस (सुपीक माती)

सुपीक मातीनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष लागवडीच्या ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ पालापाचोळा इत्यादी विघटनशील पदार्थ कुजले तरच होते. ही प्रक्रिया कचरा कुजवण्याच्या डब्यात किंवा खड्ड्यात (कंपोस्ट बीनमध्ये) किंवा खतांच्या कारखान्यात होऊ शकत नाही.