देशी आणि विदेशी गांडूळ यांमधील भेद

विदेशी गांडुळांच्या विष्ठेत ‘आर्सेनिक’, पारा, शिसे यांसारख्या विषारी धातूंचे अंश असतात आणि शेतात ‘व्हर्मीकंपोस्ट’ वापरल्याने ते विषारी अंश वनस्पतींतून मानवी शरिरात जाऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीद्वारे ‘व्हर्मीकंपोस्ट’ घालून पिकवलेले धान्य ‘विषमुक्त’ असू शकत नाही.’

लागवडीतील कामे घरातील सर्वांनी वाटून घ्यावीत !

लागवडीसंदर्भातील सर्व कामे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी विभागून केली, तर एकावरच अतिरिक्त कामांचा ताण येत नाही. सर्वांनाच लागवड स्वतःची वाटते आणि सर्वांच्या कष्टाचे फळ चाखण्याचा आनंद अनुभवता येतो !

रासायनिक शेतीची भयावहता

‘एका परिचितांकडून समजलेला प्रसंग रासायनिक शेतीची भयावहता स्पष्ट करणारा आहे, कसा तो पहा . . .

लागवड करतांना एकच पीक न घेता समवेत आंतरपिके घ्यावीत !

‘नैसर्गिक शेतीमध्ये एका वेळी एकच पीक न घेता मुख्य पिकासह साहाय्यक पिकेही घेतली जातात. या पिकांना ‘आंतरपीक’ म्हणतात. मुख्य पीक एकदल असेल, तर आंतरपीक द्विदल आणि मुख्य पीक द्विदल असेल, तर आंतरपीक एकदल असावे.

बीजामृत बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत

ज्या बिया पेरायच्या आहेत, त्यांच्यावर स्वतःच्या हाताने थोडेसे बीजामृत घालून बियाणे साधारण १ मिनिट हलकेच चोळावे. सर्व बियाण्याला बीजामृत लागण्यापुरतेच बीजामृत घ्यावे. जास्त घेण्याची आवश्यकता नसते. बिजामृत लावल्यावर बिया काही वेळ सावलीत सुकू द्याव्यात आणि मग पेराव्यात.

बीजामृताचे महत्त्व

बिजामृताचा संस्कार केल्याने उगवण रोखणारी रासायनिक संयुगे निष्क्रीय होतात आणि उगवण क्षमता वाढते. विविध घातक बुरशींचे नियंत्रण करणारी ‘मित्र बुरशी’ बिजामृतामध्ये असते. सुदृढ रोपांच्या निर्मितीसाठी ‘बीजसंस्कार’ करणे आवश्यक आहे.’

‘लागवड करणे कसे शक्य आहे’, याचे मार्ग शोधा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम – काही ठिकाणी घराभोवती फरशा बसवल्यामुळे माती नसते; परंतु तिथेही वाफे (विटांचे कप्पे) बनवून लागवड करता येते. तळमळ असेल, तर मार्ग मिळतोच ! ती जागृत ठेवा आणि ‘घरच्या घरी लागवड कशी करता येईल’, याचे मार्ग शोधा !’

नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

लागवड करणारे ४ – ५ जण एकत्रितपणे जीवामृत बनवून ते आपसांत वाटून घेऊ शकतात. त्यामुळे ‘देशी गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध होत नाही’, असा आधीच अपसमज करून न घेता ते उपलब्ध करून घेण्यासाठी कृतीशील होऊया !

कुंडीत असलेल्या झाडांसाठी ‘नैसर्गिक पद्धत’ कशी वापरावी ?

नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’

कुंडी कशी भरावी ?

. . . अशा प्रकारे भरलेल्या कुंडीमध्ये पुष्कळ पाऊस असतांनाही पाणी साचून रहात नाही आणि झाडाचे आरोग्य टिकून रहाते.