परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले          

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कोणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

खरे शिष्य

‘सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळणारेच खरे शिष्य असल्याने गुरूंना त्यांच्यासाठी आत्मिक परमेश्‍वरी सामर्थ्य खर्चावे न लागणे’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ –  (परात्पर   गुरु) डॉ. आठवले

घरच्या लक्ष्मीला न दुखवणे योग्य

‘घरच्या लक्ष्मीला दुखवले, तर पैशाचा फटका बसणार. घरच्या लक्ष्मीला अन्यायाने वागवले आणि तिच्या माहेरच्या माणसांना उगाचच बोलले, तर काहीतरी त्रास उद्भवण्याची शक्यता असते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परमेश्‍वर सर्व विश्‍वाची जबाबदारी घेतो, तरी माणसाला त्याची जाणीव नसणे

‘अनंतरूपी परमेश्‍वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्‍या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सुनेचे पाय धरल्यामुळे पुण्य सासूला मिळणे; पण सुनेची अधोगती होणे

‘पोरी, सुनेचे पाय धरलेस, तर काही वाईट वाटण्याचे कारण नाही. योग्य केलेस. पाय धरलेस ते तुझ्यात चांगुलपणा असल्याने. ते परमेश्‍वराचे पाय धरल्यासारखे झाले. पाय तिचे; पण पुण्य तुझ्याकडे आले आणि तिला आणखी अधोगती आली.’ – प.पू. आबा उपाध्ये