देहली में साहिल ने हिन्‍दू लडकी की २० बार चाकू घोंपकर और पत्‍थर से कुचलकर हत्‍या की !

भारत हिन्‍दू राष्‍ट्र होने पर ही ऐसी घटनाएं रुकेंगी !

धर्मांधाला २ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा !

माझगाव दंडाधिकारी न्‍यायालयाने १९ वर्षीय आरोपी रियाझ अहमद याला दोन वर्षांचा कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा २७ मे या दिवशी सुनावली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची नागरिक असलेल्‍या महिलेचा विनयभंग केल्‍याचा रियाझवर आरोप होता.

सर्व विभागांमध्‍ये राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे ! – मुख्‍यमंत्री

राष्‍ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक आपत्तीच्‍या वेळी राज्‍यात प्रत्‍येक ठिकाणी वेळेत पोचू शकत नाहीत. त्‍यामुळे राज्‍यात सातही विभागांच्‍या ठिकाणी राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे, असा आदेश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक !

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून स्थानांतर झाले आहे.

पुण्यात ‘तिहेरी तलाक’ प्रकरणी अकीबला अटक आणि जामीन !

विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ‘तिहेरी तलाक’ (घटस्फोट) दिल्या प्रकरणी अकीब मुल्ला याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी नंतर जामीन संमत केला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली आहे.

गोव्यात गेल्या ४ मासांत तब्बल ७३ अमली पदार्थ तस्करांना अटक, तरीही व्यवहार चालूच !

अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण आणि अमली पदार्थ उपलब्ध होऊ शकत असलेल्या परिसरात अचानक तपासणी केल्याचा दावा सरकार करत असले, तरी राज्यात संबंधित मृत्यू आणि व्यवहार चालूच !

आय.पी.एल्. सामन्यावर सट्टा लावणार्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई !

पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खराडी परिसरातील ‘गॅलेक्सी वन’ या सोसायटीमधील नवव्या माळ्यावरील एका सदनिकेवर धाड टाकून आय.पी.एल्. क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या टोळीला कह्यात घेतले.

बाली (इंडोनेशिया) येथे जर्मनीच्या महिलेचा नग्न होऊन मंदिरात प्रवेश

एका हिंदु मंदिरामध्ये नग्नावस्थेत प्रवेश करणार्‍या जर्मनीच्या महिला पर्यटकाला अटक करण्यात आली आहे. तिला मानसोपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे बढती मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसाने घेतली लाच !

अशा भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना बढती मिळतेच कशी ? वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचार्‍यांच्या कामांचा आढावा घेत नाहीत का ? अटक केलेल्या दोन्ही भ्रष्ट फौजदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या मेहुण्याची ‘ईडी’द्वारे चौकशी !

सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली आहे. ‘ईडी’चे पथक या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी येथे येणार आहे.