राहुरीच्या (नगर) पोलीस निरीक्षकाच्या समर्थनार्थ नागरिकांचे चक्काजाम आंदोलन !

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे

नगर – राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या आरोपीला राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पाठीशी घातल्याचा आरोप भाजपचे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केला. यानंतर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी दराडे यांच्या तडकाफडकी स्थानांतराचे आदेश दिले. दराडे यांच्या स्थानांतराची विधानसभेत घोषणा झाल्यानंतर येथील नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ २४ डिसेंबर या दिवशी चक्काजाम आंदोलन केले. माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह रिपाई आठवले गटाच्या पदाधिकार्‍यांसह नागरिक मोठ्या संख्येने चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. दीड घंट्यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

धर्मांतर होत असेल, तर त्याला पाठिंबा देणार नाही; मात्र चौकशी करण्याआधी अधिकार्‍याचे स्थानांतर करणे आम्हाला मान्य नसल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी या वेळी सांगितले.