मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयांची तोडफोड

‘अ‍ॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी यांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस

अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, याविषयी मनसेने दिलेल्या चेतावणीवरून ‘अ‍ॅमेझॉन’ने न्यायालयात धाव घेतली

मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू ! – मराठी राजभाषा आंदोलनाची शासनाला चेतावणी

मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशी चेतावणी ‘मराठी राजभाषा आंदोलन’ या संघटनेने शासनाला दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अशुद्ध फलकांद्वारे मराठीची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ? 

व्याकरणाच्या चुका करणारा जगातील एकमेव देश भारत ! उत्तरदायींना शिक्षा करा !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ‘दिलीप बिल्डकॉन’ या आस्थापनाकडून लावण्यात आलेल्या पथदर्शक आणि माहितीदर्शक फलकांवरील मराठी शब्द अत्यंत अशुद्ध असल्याने भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.’

मराठी भाषा आणि संस्कृती यांचा आदर केल्यास अमराठींना आमचा विरोध होणार नाही ! – नितीन सरदेसाई, मनसे

अमराठी लोकांचा आम्ही द्वेष करतो, ही चुकीची समजूत आहे.=मनसेचे नेते नितीन सरदेसाई

मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या माहितीदर्शक फलकांवर व्याकरणाच्या अनेक चुका !

पाट्याटाकूपणे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करणे आवश्यक !

कामकाजात मराठी भाषेचा उपयोग करत नसल्यावरून राज्यशासनाकडून कोकण रेल्वे प्रशासनाकडे विचारणा

केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांसह राज्याच्या प्रादेशिक भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.  

बेळगाव येथे मराठी फलकाला फासले काळे !

मराठा विकास प्राधिकरण स्थापनेविषयी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला २० नोव्हेंबर या दिवशी कन्नड भाषिकांनी काळे फासले.