मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा कधी ?

महानुभवांनी मराठी भाषेला ‘धर्म भाषा’ मानली, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘अमृताने ही पैजा जिंके’, असे मानून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात आवडेल, अशी रचना करून मराठी भाषेचा मोठेपणा सांगितला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

मराठीचा उत्कर्ष म्हणजे मराठी भाषिकांचा (स्वतःचाच) उत्कर्ष !

‘ष’ आणि ‘ळ’ या अक्षरांच्या निमित्ताने आपण आपल्या भाषांकडे कसे पहातो ?, याचा विचार करायला हवा. आपल्या भाषेचा उत्कर्ष आपल्याच हाती असून तिचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील लोकांनी स्वभाषाभिमान जोपासायला हवा !

दूध विकणारे उत्तर भारतीय लोक शेकडो वर्षांपासून मुंबईत रहात आहेत. ते हिंदीतूनच बोलतात आणि मुंबईकर मराठी त्यांच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीतून बोलतात.

मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

मालगुंड (रत्नागिरी) येथे ६ आणि ७ एप्रिलला ‘कोमसाप’चे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी राज्यशासनाची समिती पाठपुरावा घेणार !

सेवानिवृत्त भारतीय विशेष सेवेतील निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यशासनाने १४ मार्च या दिवशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळा’चे सचिव हे सदस्य म्हणून कार्यरत असतील.

शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर आणि संभाषण बंधनकारक !

अद्ययावत् मराठी भाषा धोरणाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक …

महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा धोरण घोषित !

मराठी भाषा विभागाने १३ मार्च या दिवशी राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित केले. यामध्ये येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.

आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी

संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.