‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा करतांना सौ. मधुरा कर्वे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

यवतमाळ जिल्हा विधीसेवा प्राधिकरण याच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा !

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालय येथील सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला.

सध्याच्या शाळांमध्ये बाराखडीमधील अक्षरे शिकवण्याची आणि ओळखण्याची एक निराळी गंमतीशीर पद्धत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘‘आम्हाला शाळेत ‘न’ शब्द नळाचा आणि ‘ण’ शब्द म्हणजे बाणाचा’, असे शिकवले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळेत असे काही शिकवले नव्हते. बाराखडीतील अक्षरांचा उच्चारानुसार ‘न’ आणि ‘ण’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे.’’

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.

(म्हणे) ‘महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवला, तर रक्तपात होईल !’ – नागराज वाटाळ, कन्नड संघटना

देशात आपण कायद्याचे राज्य आहे, असे एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे नागराज वाटाळ यांच्यासारखे थेट कायदा हातात घेण्याची भाषा करतात ! समाजात फूट पाडणारी अशाप्रकारे वक्तव्ये करणार्‍यांवर प्रशासनाने योग्य वेळी कारवाई करणे आवश्यक आहे !

विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो.

राष्ट्रीयीकृत बँकांनी मराठीतून व्यवहार करण्याची सावंतवाडी येथील प्रांताधिकार्‍यांची सूचना

मराठी पत्रकारदिनानिमित्त मनसेच्या वतीने बँकांमध्ये मराठीचा वापर करण्याविषयी निवेदन दिले होते. याची नोंद घेत येथील प्रांताधिकाऱ्यांनी ‘सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांचे व्यवहार मराठीतून करावेत’, अशी सूचना सर्व बँकांना दिली आहे.

मराठी भवनावरील आक्रमण खपवून घेणार नाही ! – मराठीप्रेमींची पेडणे येथील बैठकीत चेतावणी

काही मराठीद्वेष्ट्यांनी पर्वरी येथील मराठी भवनावर आक्रमण करून ‘जनमत कौल’ साजरा केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास तो खपवून घेणार नाही, अशी चेतावणी पेडणे येथे मराठीप्रेमींच्या बैठकीत देण्यात आली.