वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये यांना औषधे आणि यंत्रसामग्री पुरवठ्यासाठी लवकरच निर्णय घेणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

‘हाफकीन’ला अनुमाने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा निधी दिला; मात्र त्यापैकी अनुमाने ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे.

सीमाप्रश्नी मराठी भाषकांची गावे केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी सरकारने पुनर्विचार याचिका प्रविष्ट करावी ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एकजिनसी पद्धतीने कर्नाटकच्या दादागिरीला महाराष्ट्र सरकार कशाप्रकारे उत्तर देणार ? याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे राहू !

‘सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहू’, असा ठराव विधानसभेत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने चालू करण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

मुंबई येथील विधीमंडळाच्या सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार !

विधीमंडळाच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी ऑगस्ट २०२२ या मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे निवेदन केले होते.

आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई पंचनामे’ करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र

शेतकर्‍यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे.

… तर आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य मिळणार नाही ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र

पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच आर्थिक साहाय्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. कर्जबाजारीपणा, नापीकता या कारणामुळे आत्महत्या झाली, तरच शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य देण्यात येईल.

महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तन आणि वैद्यकीय साहित्यात भ्रष्टाचार प्रकरणी जालनामधील जिल्हा वैद्यकीय अधिकारी निलंबित !

डॉ. तानाजी सावंत यांनी वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२१ आणि २२ या कोरोनाच्या कालावधीत आरोग्यक्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे असे आश्वासन दिले.

आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित !

सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाविषयी सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.

शेतकरी उघड्यावर असतांना मुख्यमंत्र्यांच्या देहलीच्या वार्‍या चालू आहेत ! – उद्धव ठाकरे, ठाकरे गटप्रमुख

नवस बोलणे आणि नवस फेडणे यासाठी वारंवार त्यांना देहली येथे जावे लागते. आजचा दिवस गेला आहे म्हणून नवस फेडतो. उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करतो. यासाठीच त्यांच्या देहली येथे वार्‍या चालू आहेत; पण यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे ?