Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !

ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !

Indian Navy Somalia Pirates : भारतीय नौदलाने सोमालियाच्या ३५ समुद्री दरोडेखोरांना दिले मुंबई पोलिसांच्या कह्यात !

या वेळी नौकेतील एका सदस्याचीही सुखरूप सुटका करण्यात आली.

Moscow ISIS Attack : रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

VHP America Rath Yatra : अमेरिकेतील शिकागो येथून श्रीराममंदिर रथयात्रेला प्रारंभ : ४८ राज्यांतील ८५१ मंदिरांना भेट

हनुमान जयंतीच्या दिवशी होणार सांगता !

पाककडून भारतीय मासेमारी नौकेवर कारवाई करतांना ती बुडाली !

पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार २१ मार्च या दिवशी ७ भारतीय मासेमार त्यांच्या नौकेद्वारे पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसले.

युक्रेनच्या राजधानी कीव्हवर रशियाचे आक्रमण !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन दोन वर्षे उलटली आहेत. रशियाने २१ मार्चच्या पहाटे पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात किमान ८ जण घायाळ झाले आहेत.

कंदहार (अफगाणिस्तान) येथील बाँबस्फोटात ३० जण ठार !

एका गजबजलेल्या बाजारात झालेल्या भीषण बाँबस्फोटात ३० जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक घायाळ झाले आहेत. यांपैकी बहुतांश जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचे त्यागपत्र

आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी पदाचे, तसेच त्यांच्या पक्षाच्या नेतेपदाचेही त्यागपत्र दिले आहे. ते म्हणाले की, माझे पद सोडण्याचे कारण वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही आहे.

German Research Ship : जर्मनीच्या संशोधन नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरावर थांबण्यास दिली अनुमती

चीनचा थयथयाट !

Sri Lanka India Agreement : श्रीलंकेने ३ सौरऊर्जेच्या प्रकल्पांतून चीनला हटवून भारताशी केला करार !

संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !