चीनचा थयथयाट !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने पुन्हा एकदा त्याच्या बंदरावर संशोधन करणार्या विदेशी नौकांना थांबण्याची अनुमती दिली आहे. यानुसार जर्मनीच्या एका नौकेला आता ही अनुमती देण्यात आली आहे. यावरून चीनने श्रीलंकेवर टीका केली आहे. श्रीलंकेतील चिनी दूतावासाने निषेध करतांना म्हटले आहे, ‘फेब्रुवारीमध्ये आमच्या नौकेला श्रीलंकेच्या बंदरावर थांबण्याची अनुमती नव्हती, मग जर्मन नौकेला थांबू का दिले?’ त्या वेळी भारताने आक्षेप घेतल्यानंतर श्रीलंकेने संशोधनाच्या नावाखाली हेरगिरी करणार्या चिनी नौकेला अनुमती नाकारत संशोधन करणार्या सर्व विदेशी नौकांवर बंदी घातली होती.
संपादकीय भूमिकाश्रीलंकेने कोणत्या देशांच्या नौकांना संशोधनासाठी अनुमती द्यावी किंवा देऊ नये, या त्याचा प्रश्न आहे; मात्र चीन सातत्याने श्रीलंकेच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घालून त्याला कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेने चीनचा दबाव झुगारणे आणि त्यासाठी भारताने त्याला वेळोवेळी साहाय्य करणे, हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे ! |