असा निर्णय सर्वच महाविद्यालयांनी घ्यावा !

कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याच्या अर्जासमवेतच एक प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. यात ‘कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही’, असे नमूद करण्यात आले आहे.

बिहार सरकारचा हिंदुद्रोही निर्णय जाणा !

बिहार सरकारने सरकारी शाळांना देण्यात येणार्‍या सुट्ट्यांमध्ये कपात केली आहे. रक्षाबंधन, हरितालिका, विश्वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गुरु नानक जयंती या सणांना असलेल्या सुट्ट्या रहित करण्यात आल्या आहेत.

भारतात मुसलमान नाही, तर हिंदु असुरक्षित !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील खीरी गावात सत्‍यम शर्मा या १६ वर्षांच्‍या मुलाने त्‍याच्‍या बहिणीच्‍या मुसलमानांकडून काढण्‍यात येणार्‍या छेडछाडीला विरोध केला. त्‍यामुळे मुसलमानांनी केलेल्‍या मारहाणीत त्‍याचा मृत्‍यू झाला.

हे आहे काँग्रेसचे खरे स्‍वरूप !

पूर्वीच्‍या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेवर (‘इस्रो’वर) विश्‍वास नव्‍हता. तेव्‍हा अर्थसंकल्‍पात ‘इस्रो’साठीची आर्थिक तरतूद अतिशय मर्यादित होती, असे ‘इस्रो’चे माजी शास्‍त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी एका मुलाखतीत सांगितले.

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती जाणा !

मलेशियाचे पंतप्रधान दातूक सेरी अन्‍वर इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी सेलांगोर येथील एका मशिदीत नमाजपठणानंतर एका हिंदु तरुणाचे उघडपणे धर्मांतर करून त्‍याला इस्‍लामची दीक्षा दिली. याला मलेशियातील हिंदूंकडून विरोध केला जात आहे.

काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांची धर्मांधता जाणा !

चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्वविद्यालय परिसरात काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ अशी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. या विद्यार्थ्यांना दुसर्‍या गटाने विरोध केला. या हिंसाचारात ८ जण घायाळ झाले.

अमेरिकेतील पाद्य्राचा हिंदुद्वेष जाणा !

‘अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठीचे संभाव्‍य उमेदवार रामास्‍वामी निवडून आले, तर आपल्‍याला व्‍हाईट हाऊसमध्‍ये विचित्र प्रकारच्‍या हिंदु देवतांच्‍या प्रतिमा पहायला मिळतील’, अशी टीका ख्रिस्‍ती पाद्य्राने केली आहे.

अशा शाळांची मान्‍यता रहित करा !

अजमेर (राजस्‍थान) येथील सोफिया शाळेतील सर्व विद्यार्थ्‍यांकडून ‘क्रीडा प्रकारां’च्‍या नावाखाली वैद्यकीय प्रमाणपत्र मागवण्‍यात आले. यामध्‍ये त्‍यांना त्‍यांची कंबर आणि नितंब यांचा आकारही नमूद करण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे.

भूमी कह्यात घेणारा वक्‍फ बोर्ड कायदाच रहित करा !

केंद्रशासनाने देहली वक्‍फ बोर्डाशी संबंधित १२३ मालमत्ता नियंत्रणात घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. यात मशीद, कब्रस्‍तान आणि दर्गा यांचा समावेश आहे. या प्रकरणी केंद्रशासनाकडून देहली वक्‍फ बोर्डाला नोटीस पाठवण्‍यात आली आहे.

काँग्रेसच्‍या धर्मांध नेत्‍याची धमकी जाणा !

काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते अझीझ कुरेशी यांनी ‘मुसलमानांवर अत्‍याचार होत असून पाणी डोक्‍यावरून जाईल, तेव्‍हा मुसलमान हातामध्‍ये बांगड्या भरून बसणार नाहीत. २२ कोटींपैकी २ कोटी मुसलमान ठार झाले, तरी अडचण नाही’, असे विधान केले आहे.