तृणमूल काँग्रेस सरकारची हुकूमशाही जाणा !

लैंगिक शोषणाचा आरोपी असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याला कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे; मात्र बंगाल पोलिसांनी याला नकार दिला आहे.

हिंदूंच्या नेत्यांना असणारा धोका जाणा !

‘केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी पंतप्रधान मोदी यांना जिवे मारणार’, अशी धमकी कर्नाटकमधील महंमद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने दिली आहे. त्याने सामाजिक माध्यमांतून हातात तलवार घेतलेला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले असून यांत एक जण मुसलमान आहे. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात.

भारत असे कधी करणार ?

फ्रान्समध्ये मार्चपासून २३ सहस्र घुसखोरांना बाहेर काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. यात सीरिया, इराक, पाकिस्तान, मोरक्को, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त या देशांतील लोकांचा समावेश आहे.

अशा स्थितीत हिंदूंचे रक्षण कसे होणार ?

बिहारच्या एकमी गावात रहाणार्‍या महंमद जावेद याच्या घरातून पोलिसांनी ७ जिवंत बाँब जप्त केले. २९ फेब्रुवारीच्या रात्री जावेदच्या घरात स्फोट झाला होता. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांना जावेदच्या घरातून हे बाँब जप्त केले.

काँग्रेसच्या राज्यातच कसे होतात बाँबस्फोट ?

बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या स्फोटात ९ जण घायाळ झाले. ‘हा बाँबस्फोट होता’, अशी माहिती राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

भारताचा शत्रू आणि पाकचा मित्र असलेला काँग्रेस पक्ष !

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद विधान परिषदेमध्ये म्हणाले, ‘‘भाजपवाल्यांसाठी पाकिस्तान एक शत्रूराष्ट्र आहे; मात्र आमच्यासाठी पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही. तो केवळ एक शेजारी देश आहे.’’

पंजाबमध्येही हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

लुधियाना (पंजाब) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड केली. प्रशासनाने हिंदूंना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदु संघटनांनी प्रशासनाला कारवाईसाठी ७२ घंट्यांचा अवधी दिला आहे.

संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात असा पालट करा !

अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.