सरपंचपदाची आरक्षण सोडत पुढे ढकलली
जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबर या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबर या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.
कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने लांबलेल्या निवडणुका आता घेण्यात येत आहेत.
मतदारांना माहिती न देताच त्यांची नावे मतदारसूचीतून गाळली जात आहेत किंवा समाविष्ट केली जात आहेत. विशेषत: मुरगाव तालुक्यात हा प्रकार आढळून आला, अशी तक्रार ‘गोवा फॉरवर्ड’ आणि काँग्रेस या पक्षांनी गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीमुळा लागू करण्यात आलेली आचारसंहिता निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर या दिवशी मागे घेतली आहे.
राज्यातील ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १५ केंद्रे अधिसूचित केली आहेत.
जिल्हा पंचायत निवडणूक जनतेवर लादली नाही, तर ती नियमानुसार योग्य वेळी घेण्यात आली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
कोेरोना महामारीच्या सावटाखाली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ डिसेंबर या दिवशी ५६.८२ मतदान झाले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५५ टक्के, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५८.४३ टक्के मतदान झाले.
महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांतील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार १५ जानेवारी २०२१ या दिवशी मतदान होणार असून १८ जानेवारी २०२१ या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षपातळीवर लढवली जात आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आप आदी महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित होणार्या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.