
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – इस्लामिक स्टेट या बंदी असलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेला साहाय्य केल्याच्या प्रकरणी लक्ष्मणपुरीतील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने राकिब इमाम अंसारी याला ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला ६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश उमाकांत जिंदल यांनी हा निर्णय दिला. राकिब अंसारीने न्यायालयात आवेदन (अर्ज) देऊन स्वतःच्या गुन्ह्याची स्वीकृती दिली होती. त्यानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली. हे प्रकरण तरुणांना इस्लामिक स्टेटशी जोडणे, देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि कट रचणे, या आरोपांशी संबंधित आहे.
मुंबईपासून चालू झाले अन्वेषण
या प्रकरणाचा आरंभ मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रथमदर्शन अहवालापासून (‘एफ्.आय.आर्.’पासून) झाला. या प्रकरणाच्या अन्वेषणात शाहनवाज आणि रिझवान अली हे इस्लामिक स्टेटचे सक्रीय सदस्य असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अन्वेषण चालू केले. पुढील अन्वेषणात राकिब इमाम अंसारीचे या आरोपींशी संपर्क असल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणात सरकारी पक्षाने न्यायालयात १७ साक्षीदार आणि विविध पुरावे सादर केले.
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !