Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ


पुरी (ओडिशा) : येथे रथयात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक भाविक घायाळ झाले आहेत. लाखो भाविक ‘बडा डांडा’ (ग्रँड रोड) येथे रथांचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्यासाठी वाट पहात उभे होते. याच वेळी प्रचंड गर्दीमुळे अचानक ढकलाढकली चालू झाली, ज्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक भाविक खाली पडले आणि एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभागाची पथके आणि अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोचली आणि त्यांनी घायाळांना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने रुग्णालयात नेले. प्रशासनाने परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवल्याचा दावा केला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहेत.