चेन्नई (तामिळनाडू) – केवळ महिला आणि पुरुष यांच्यात प्रेम किंवा अंतरंग संबंध होते, यावरून प्रत्येक शारीरिक संबंध संमतीनेच प्रस्थापित झाले होते, असा निष्कर्ष काढता येणार नाही. जर अशा प्रकरणांमध्ये महिलेची संमती फसवणूक, ब्लॅकमेल, धमकी किंवा खोट्या आश्वासनामुळे मिळवली असेल, तर ती कायद्याच्या दृष्टीने वैध संमती मानली जाणार नाही. प्रत्येक प्रकरणातील तथ्यांची स्वतंत्र तपासणी करणे आवश्यक असून केवळ संबंधांच्या स्वरूपावरून आरोपीला दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात स्पष्ट केले.
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, प्रत्येक अयशस्वी प्रेमसंबंध किंवा नंतर लग्न न होणे म्हणजे आपोआप बलात्काराचे प्रकरण बनत नाही. आरोपीची मानसिकता आधीपासूनच फसवणुकीची होती कि नाही, हे पहाणे आवश्यक ठरेल.
काय आहे प्रकरण ?
तामिळनाडूतील एका शहरातील सूजी उपाख्य कासी नावाच्या आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर कासीने नोकरी आणि लग्न यांचे आमीष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. आरोपीने पहिल्याच भेटीत पीडितेच्या विरोधानंतरही तिचे लैंगिक शोषण केले. नंतर त्याने क्षमा मागितली, नोकरी आणि लग्न यांचे वचन पुन्हा दिले आणि तिला पुन्हा भेटण्यास प्रवृत्त केले. यानंतर त्याने वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. शेवटी एक दिवस कुटुंबाने नकार दिल्याचे कारण सांगून त्याने पीडितेपासून अंतर राखले. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने तथ्यांच्या आधारे हा बलात्कार मानून आरोपीला शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते.

थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ