
नवी देहली – प्रवाशांसाठी डिजिटल सेवा अधिक सोपी करण्याच्या उद्देशाने ‘भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळा’च्या (म्हणजे ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ अर्थात् ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या) तिकीट आरक्षण ‘पोर्टल’ची नवीन ‘बीटा’ आवृत्ती चालू केली आहे. या नव्या संकेस्थळामुळे आता तिकीटाची आरक्षणप्रक्रिया आधीपेक्षा अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
वर्ष २००२ मध्ये चालू झालेल्या ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या संकेस्थळावरून प्रतिदिन सरासरी १४.५ लाख रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण केले जाते. मोठ्या प्रमाणातील वापर लक्षात घेऊन नवीन ‘पोर्टल ’अधिक सोप्या ‘इंटरफेस’सह (वापरसुलभ रचनेसह) सिद्ध करण्यात आले आहे. ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या जुन्या संकेस्थळाच्या ‘होमपेज’वरील ‘NEW’ पर्यायावर ‘क्लिक’ करूनही नवीन संकेतस्थळावर जाता येते.
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
लोकलमधील वातानुकूलन यंत्र १५ मिनिटे बंद; प्रवासी गुदमरले, महिला बेशुद्ध !
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी
मराठी प्रवाशाला बळजोरीने अंधेरी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात २ घंटे डांबले !
Railway New Rule : रेल्वेचे अनारक्षित तिकीट ‘वॉट्सॲप’वर दाखवणे अवैध : ‘रेल वन’ ॲपमधील मूळ तिकीट दाखवणे अनिवार्य