‘नीट’ प्रश्नपत्रिका घोटाळा प्रकरण
मोटेगावकर याची संपत्ती १ सहस्र ५०० कोटी रुपये असल्याचे उघड !
(‘नीट’ म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा)

लातूर – नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात ‘रेणुकाई करिअर सेंटर’चा संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (‘एन्.टी.ए.’च्या) समितीतील प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांना ५ लाख रुपये दिले होते, असा खुलासा केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) एका विशेष न्यायालयात केला.
‘सीबीआय’ने मोटेगावकरचा भ्रमणभाषसंच जप्त केला असून त्यात रसायनशास्त्राच्या १३२ हस्तलिखित प्रश्नांची छायाचित्रे आढळली आहेत. यांतील १११ प्रश्न मूळ नीटच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले आहेत. एकेकाळी अर्धवेळ शिक्षक असणार्या मोटेगावकर याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून तब्बल १ सहस्र ५०० कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे. गेल्या वर्षीही अशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा ‘सीबीआय’ला संशय आहे.
मोटेगावकर श्रीमंत आणि अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत असे. परीक्षेच्या शेवटच्या १५ दिवसांत ‘वन-ऑन-वन मेंटरिंग कोर्स’च्या नावाखाली या विद्यार्थ्यांना फुटलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न-उत्तरे पाठ करून घेतली जात असत. या घोटाळ्याची पाळेमुळे नाशिक, पुणे, जयपूर आणि गुरुग्रामपर्यंत पसरली आहेत. या प्रकरणी सीबीआय आता विवेक पाटील नावाच्या संशयितासह ‘एन्.टी.ए.’चे काही अधिकारी आणि दलाल यांचा शोध घेत आहे.
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !