मौलाना जर्जिस अन्सारी याचे संतापजनक विधान

रांची (झारखंड) – भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्षात मुसलमान होते आणि ते ५ वेळा नमाजपठण करायचे, असे विधान मौलाना (इस्लामचा अभ्यासक) जर्जिस अन्सारी याने केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर हिंदु संघटनांकडून त्याच्यावर टीका करण्यात येत असून त्याच्या अटकेची मागणी केली जात आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील एका धार्मिक सभेतील असल्याचे सांगितले जात असून तो २३ जून २०२६ चा आहे. मौलाना जर्जिस उत्तरप्रदेशातील इटावा जिल्ह्यातील रहिवासी असून यापूर्वीही त्याने वादग्रस्त विधाने केली आहेत. (पहिल्याच वादग्रस्त विधानाच्या वेळी कठोर कारवाई का झाली नाही ? तेव्हाच कारवाई झाली असती, तर आज असे बोलण्याचे त्याचे धाडस झाले नसते ! आतातरी त्याच्यावर कारवाई होणार आहे का ? – संपादक)
श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकाचा विपर्यास
भाषणात मौलाना अन्सारी याने श्रीमद्गवद्गीतेतील एका श्लोकचा संदर्भ देत स्वतःचा दावा खरा असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गीतेतील अध्याय ६ मधील १० व्या श्लोकाचा (योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः) उल्लेख केला. मौलानाने दावा केला, ‘या श्लोकात भक्तांना पूर्ण शरिराने प्रार्थना करण्याचा (नमाजसारखा) निर्देश दिला आहे. जर हिंदूंनी त्यांचे ग्रंथ नीट वाचले, तर त्यांना इस्लाम हाच वैश्विक धर्म असल्याचे पटेल. भगवान राम आणि कृष्ण यांच्याशी संबंधित ग्रंथांमध्येही हेच लिहिले आहे.’
श्लोकाचा वास्तविक अर्थ
‘एका योग्याचे कर्तव्य आहे की, त्याने स्वतःचे मन, शरीर आणि आत्मा निरंतर परमेश्वराच्या चरणी लीन करावे. एकांतात राहून, मन आणि इंद्रिये यांवर नियंत्रण मिळवून, सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा आणि मोहापासून मुक्त व्हावे’, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकात कुठेही ‘नमाज’ किंवा ‘इस्लाम’ या शब्दांचा संबंध नाही. केवळ ध्यान आणि योग यांद्वारे ईश्वरप्राप्तीचे मार्गदर्शन यात केले आहे.
मौलानाने संपूर्ण हिंदु समाजाची विनाअट क्षमा मागावी ! – श्रीकृष्णजन्मभूमी खटल्याचे पक्षकार महेंद्र प्रताप सिंह

श्रीकृष्णजन्मभूमी खटल्याचे पक्षकार महेंद्र प्रताप सिंह यांनी मौलाना जर्जिस याच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, हे विधान हिंदु समाजाच्या श्रद्धेवर थेट आघात आहे. जिथे इस्लामचा इतिहास अनुमाने १ सहस्र ४०० वर्षे जुना आहे, तिथे भगवान श्रीकृष्णाचा अवतार ५ सहस्र वर्षांपूर्वी झाला होता. मौलानाला भगवद्गीता आणि त्यातील श्लोक यांचे कोणतेही ज्ञान नाही. या अत्यंत चुकीच्या आणि वादग्रस्त विधानाविषयी मौलाना जर्जिस याने संपूर्ण हिंदु समाजाची विनाअट क्षमा मागितली पाहिजे.
मौलानाला पाकिस्तानात पाठवा ! – ‘श्रीकृष्ण जन्मसंघर्ष न्यासा’चे अध्यक्ष दिनेश फलाहारी

‘श्रीकृष्ण जन्मसंघर्ष न्यासा’चे अध्यक्ष दिनेश फलाहारी यांनी मौलानावर टीका करतांना म्हटले की, भगवान श्रीकृष्ण ५ सहस्र वर्षांपूर्वी अवतरित झाले होते आणि मौलानाचे पूर्वजही सनातनीच होते. देवाविषयी असे चुकीचे वक्तव्य करणार्यांना तातडीने पाकिस्तानात पाठवून दिले पाहिजे.
व्हिडिओ एका मोठ्या कटाचा भाग असण्याची शक्यता ! – भाजप
भाजपचे नेते मनीष शुक्ला यांनी शंका व्यक्त केली की, हे वादग्रस्त विधान एखाद्या मोठ्या आणि खोल कटाचा भाग असू शकते. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी झारखंडमध्ये गुन्हा नोंदवून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court