Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्‍या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !

जोधपूर (राजस्थान) – येथील मंडोर मोकळ्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पुरुष आणि महिला बंदीवान यांना विवाह करण्यास राजस्थान उच्च न्यायालयाने अनुमती दिली. राज्य सरकारनेही या विवाहाला कोणतीही हरकत घेतली नाही. २२ जुलैला त्यांचा विवाह होणार आहे.

मूलाराम आणि सीमा हे बंदीवान मोकळ्या कारागृहात शेतीचे काम करत होते. कामाच्या वेळी दोघांची जवळीक झाली होती. मूलारामने त्याच्या शेजार्‍याची, तर सीमाने पतीची हत्या केली होती. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

कारागृहाचा उद्देश गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ! – न्यायालय

न्यायालयाने म्हटले की, कारागृह व्यवस्थेचा मुख्य उद्देश गुन्हेगारांना केवळ शिक्षा देणे किंवा त्यांना समाजापासून वेगळे करणे हा नाही, तर त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची संधी उपलब्ध करून देणे, हादेखील आहे.