भागवतो नमः !

‘सर्व भूतांच्या ठिकाणी जो आपलेच भगवद्स्वरूप बघतो आणि भगवद्स्वरूप असणार्‍या आपल्या ठिकाणी जो सर्व भूतांचे दर्शन घेतो अन् ज्याला आपल्या ठिकाणी सर्व भूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो, तोच भागवतो नमः।’

कुकर्म्यांना शिक्षा का करायची ? हेही ज्ञान नसलेले कलियुगातील शासनकर्ते !

‘शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, ‘‘हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण (चांगुलपणाने होणारी कृत्ये), रजोगुण (वासनांच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये) आणि तमोगुण (अज्ञानामुळे होणारी कृत्ये).