महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन  

राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

सांगलीत ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या

दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार पहाता सध्याचे कायदे पुरसे नसून आरोपींना धाक वाटावा अशा कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच वारंवार होणार्‍या घटना महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेच अधोरेखित करतात !

पुणे येथे रेल्वे स्टेशन मास्तरांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन 

रेल्वेचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, यांसह विविध मागण्यांसाठी  रेल्वे स्टेशन मास्तरांनी आंदोलन केले .

कोट्यवधी रुपये व्यय करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील नद्या प्रदूषितच !

यातून कोट्यवधी रुपये वाया गेले असेच झाले. संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित !

युवा पिढीने भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक ! – प्रा. नम्रता कंटक

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली, विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांनी स्वतःच्या आयुष्यात गीतेला विशेष महत्त्व दिले.

चालत्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पळवले ५० सहस्र रुपये

शेती कापसाच्या विक्रीतून आलेले ५० सहस्र रुपये बँकेतून काढून नेतांना चोरट्यांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतून ते पळवले. ही घटना चौकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आणि त्यावरून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

श्री शिवाजी विद्यापिठाच्या उपकेंद्रासाठी ७८ गुंठे भूमीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी 

राज्यसभा खा.छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे श्री शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र होण्यासाठी खावली येथील ७८ गुंठे जमीन वर्ग करण्याविषयी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आग्रहाची मागणी केली. 

यवतमाळ येथे जन्मत: दोष असणार्‍या बाळांवर उपचार करणार्‍या केंद्राचे उद्घाटन  

या उद्घाटन सोहळ्यात नगराध्यक्ष, जी.प. अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जि.पो. अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आदी गणमान्य उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रसायनयुक्त जुन्या साड्या नदीपात्रात धुवून पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कठोर कारवाई करा ! – करवीर शिवसेना

ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय घोरपडे यांना देण्यात आले.