मगो पक्षाची नूतन केंद्रीय समिती घोषित

१७ जानेवारीला झालेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत श्री. दीपक ढवळीकर ४०९ मतांनी विजयी ठरल्याने त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली.

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही आढळले कोरोनाचे विषाणू !

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीमच्या ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून खरेदी करणार्‍या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

श्रीराममंदिर उभारणीसाठी अवैध देणगी गोळा केल्यावरून राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंद

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी अवैधरित्या देणगी गोळा केल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.

आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी या दिवशी स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला आरंभ होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वेगळे पटल असून १ घंट्यात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

धावत्या लोकलमधून हिंदु पत्नीला ढकलून देणार्‍या धर्मांधाला अटक

कायद्याचे भय नसलेल्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हिंदु मुलींचे जीव वाचतील ! धर्मांधांच्या प्रेमाच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याशी निकाह करणार्‍या हिंदु तरुणी यातून काही बोध घेतील का ?

औरंगजेबाप्रती प्रेम कशासाठी ?

औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे.छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. 

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची काढण्यात येणार रथांतून मिरवणूक !

सोमवार, १८ जानेवारीपासून जत्रोत्सवाला प्रारंभ होत असून शनिवार, २३ जानेवारीपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांनुसार जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. १८ जानेवारी या दिवशी सकाळी धार्मिक विधी झाल्यावर बारा गावकर नमनाला बसणार आहेत.

अशा कसायांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मवाना भागामध्ये गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायाच्या कुटुंबाने शस्त्रांसह प्राणघातक आक्रमण केले. यात एका महिला पोलीस शिपायाच्या गळ्यात फाशीचा दोर आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वेंगुर्ला येथे २३ ते २६ जानेवारी या कालावधीत कीर्तन महोत्सव होणार

वेंगुर्ला तालुक्यातील ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला आणि श्री देव रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्‍वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.