परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’

आंतरिक ‘मेक-अप’चे महत्त्व !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी जप खर्च होतो आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही ईश्वरप्राप्ती होत नाही !

‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही. त्याचे कारण वरीलप्रमाणे आहे. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, हानी होते, म्हणून ती करू नये.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत.

सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

कुठे शेतकरी, तर कुठे सरकारी कर्मचारी !

‘शेतकर्‍यांना सुटी नाही. ते आठवड्याचे सातही दिवस शेतात कष्टाचे काम करतात, तरी ते गरीब असतात. याउलट सरकारी कर्मचारी आठवड्यातील पाच दिवसच काम करतात आणि तेही कष्टाचे नसते, तरी त्यांना गरिबी म्हणजे काय, हे ज्ञात नसते.’