प्राण्यांकडून शिका !

कुठे समष्टी स्तरावर कार्य करणार्‍या मुंग्या, तर कुठे स्वार्थी मनुष्य !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कोठे अन्नपदार्थांचे कण असल्यास त्याला लगेच मुंग्या लागतात. यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य असते की, त्या कधीच स्वतःसाठी अन्न गोळा करत नाहीत. अन्नकण गोळा करतांना सर्व मिळून ते त्यांच्या वारुळामध्ये घेऊन जातात. एखादी मुंगी तेथेच खात आहे किंवा मुग्यांमध्ये एखाद्या कणासाठी खेचाखेची चालू आहे, असे दिसत नाही. याउलट सर्व प्राण्यांमध्ये ‘बुद्धीमान’ असणारा मनुष्य नेहमी स्वतःचाच विचार करत असतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०२१)