स्‍मारक म्‍हणून जतन करण्‍यात येणारी नौदलाची ‘टी-८०’ युद्धनौका कल्‍याण खाडीकिनारी ठेवणार !

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेच्‍या ‘स्‍मार्ट सिटी’ प्रकल्‍पांतर्गत दुर्गाडी गडाजवळ असलेल्‍या खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारण्‍यात येणार आहे. यात नौदलाच्‍या सेवेतून निवृत्त झालेली ‘टी-८०’ ही युद्धनौका स्‍मारक म्‍हणून जतन करण्‍यात येणार आहे.

‘इंडियन मुजाहिद्दीन’चे नाव घेत मुंबईवर आक्रमण करण्‍याची धमकी !

बईवर आक्रमण करण्‍याची धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचे नाव घेत देण्‍यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर धमकीचा दूरभाष आला होता.

मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्‍पर्धा !

शब्‍दमर्यादा १२०० असून इच्‍छुकांनी युनिकोड मराठीमध्‍ये टंकलेखन करून लेख [email protected] या मेलवर २० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्‍वरूप आहे.

विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने महाशिवरात्रीला पावनगड (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन ! – अधिवक्‍ता सुधीर वंदूरकर-जोशी

ज्‍याप्रमाणे विशाळगडाची अवस्‍था झाली आहे, त्‍याप्रमाणे पावनगडाची अवस्‍था होऊ नये; म्‍हणून या वर्षीपासून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने महाशिवरात्रीला पावनगड येथे भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

इयत्ता १२वी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांना तिकीटदरात ३० टक्‍के सवलत !

येथील मेट्रोच्‍या चारही मार्गिका चालू झाल्‍यावर मेट्रोने एका मासात तब्‍बल ४ वेळा तिकीटदरात वाढ केल्‍याने विद्यार्थी अप्रसन्‍न आहेत. त्‍यामुळे मेट्रो व्‍यवस्‍थापनाने ७ फेब्रुवारीपासून तिकीट शुल्‍कात घट करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया ‘वॉटर टॅक्‍सी’ सेवेचा शुभारंभ !

या वॉटर टॅक्‍सी सेवेमुळे एकूण २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. या सेवेमुळे मुंबईला ५५ मिनिटांमध्‍ये पोचता येणार आहे.

भ्रमणभाषवर वेळ घालवण्‍याचे प्रमाण ३२ टक्‍क्‍यांनी वाढले !

भ्रमणभाषवर वेळ घालवणार्‍यांनी आपला वेळ राष्‍ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !

नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

धर्मांतराच्‍या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्‍याचार करणार्‍या सर्व नराधमांना मृत्‍यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्‍याचारांचे प्रमाण वाढले आहे.

पुणे-नाशिक ‘हायस्‍पीड रेल्‍वे’ प्रकल्‍पामुळे दोन्‍ही शहरांच्‍या विकासाला चालना मिळणार ! – देवेंद्र फडणवीस

३ जिल्‍ह्यांना जोडणारा असल्‍याने या तिन्‍ही जिल्‍ह्यांच्‍या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्‍यांना शेतमालाची ने-आण करण्‍याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.

पिंपरी (पुणे) येथे गायींना बेशुद्ध करून कत्तलीसाठी नेणार्‍या ६ धर्मांधांना अटक !

विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्‍या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्‍याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी