नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

४ जणांना अटक, १ पसार !

नाशिक – जिल्‍ह्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमीष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजले आणि तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करत तिला मारहाण केली. ही घटना वैदूवाडी येथे ४ फेब्रुवारी या दिवशी उघडकीस आली. या प्रकरणी सिन्‍नर पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून यातील १ आरोपी पसार झाला आहे. आरोपी भाऊसाहेब उपाख्‍य भावड्या यादव दोडके (वय ३५ वर्षे), कथित फादर राहुल आरणे (वय ४५ वर्षे), रेणुका दोडके (वय २९ वर्षे), प्रेरणा साळवे (वय २५ वर्षे) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. धर्मांतराच्‍या नावाखाली पीडित महिलेला बळजोरीने घरात डांबून तिच्‍यावर अत्‍याचार करण्‍यात आला.

पीडित महिलेच्‍या पतीने तिला शोधल्‍यावर आरोपींनी त्‍याला दमदाटी करून हुसकावून लावले, तसेच तिच्‍या लहान मुलाला तेथे बळजोरीने ठेवून घेतले. पतीने सामाजिक कार्यकर्त्‍यांसमवेत तेथे जाऊन पीडितेची सुटका केली. पीडित महिला आणि तिचे पती यांनी संगमनेर येथील महिला सामाजिक कार्यकर्त्‍यांची भेट घेऊन सर्व घटना सांगितली. पीडित महिलेच्‍या तक्रारीवरून ५ जणांच्‍या विरोधात पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य असल्‍याचे दर्शवणारी घटना !
  • धर्मांतराच्‍या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्‍याचार करणार्‍या सर्व नराधमांना मृत्‍यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्‍याचारांचे प्रमाण वाढले आहे.
  • अशा घटना रोखण्‍यासाठी धर्मांतरविरोधी कायदा होणे अपरिहार्य आहे !