कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करण्याचा ‘म्हादई बचाव अभियान’चा विचार

कर्नाटक सरकारने एक दगड हालवला किंवा झाड कापले, तरी आम्ही वर्ष २०१७ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निवाड्याचा अवमान केल्यावरून न्यायालयात जाणार आहोत.

ध्वनीप्रदूषणावरून सनबर्नच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई ! – प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयाला दिली माहिती

न्यायालयाने फैलावर घेतल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय वृत्तीचे नव्हे, तर स्वतःहून प्रदूषणाच्या विरोधात कारवाई करणारे तत्त्वनिष्ठ अधिकारी असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ हवे !

तुर्भे येथे शिष्‍यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्‍य भरून देण्‍याची सुविधा !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी घोषित केलेल्‍या शिष्‍यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्‍य भरून देण्‍याची सुविधा तुर्भे सेक्‍टर २१ येथील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या जनसंपर्क कार्यालयात चालू करण्‍यात आली आहे…

नांदेड येथील १५० कोटींच्‍या कामांवरील स्‍थगिती हटवण्‍याचा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठाने नांदेड महानगरपालिकेतील विकासकामांवरील स्‍थगिती उठवत शहरातील विकासकामांचा निधी वितरित करण्‍याचे आदेश २३ जानेवारी या दिवशी दिले आहेत.

हिंगोली येथे शेतकर्‍यांकडून रस्‍त्‍यावर दूध ओतून संताप व्‍यक्‍त !

पीक विमा न मिळाल्‍याच्‍या निषेधार्थ जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांनी चालू केलेले आमरण उपोषण सहाव्‍या दिवशीही चालूच होते. या काळात केलेली आंदोलने आणि शेतकर्‍यांकडून चालू असलेल्‍या उपोषणाची प्रशासनाकडून अपेक्षित नोंद घेतली जात नसल्‍याने शेतकरी संतप्‍त झाले आहेत.

लातूर येथे शासकीय निधीची रक्‍कम खासगी खात्‍यात जमा केल्‍याच्‍या प्रकरणी ४ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

शासकीय निधी खासगी खात्‍यात जमा करून शासनाची फसवणूक करणार्‍यांकडून तो पैसा सव्‍याज वसूल करून घ्‍यावा !

नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल !

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही उपराजधानीसारखी शहरे अस्‍वच्‍छ असणे हा जनतेला प्रशासनाने शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

आटपाडी (जिल्‍हा सांगली) येथे धर्मांतर घडवणार्‍या गुन्‍हेगाराला पाठीशी घालण्‍यासाठी ख्रिस्‍ती समाजाचा मोर्चा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगलीतील शांतीनगर येथे हिंदु मातंग समाजाची फसवणूक करून धर्मांतर करण्‍यात आले आहे. सध्‍या महाराष्‍ट्रात धर्मांतरबंदी कायदा करण्‍यात यावा, यासाठी प्रत्‍येक शहरामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेचे भव्‍य मोर्चे निघत असल्‍यामुळे धर्मांतरबंदी कायदा झाल्‍यास या तथाकथित नेत्‍यांची दुकानदारी बंद पडेल.

सातारा येथे कोयता गँगची दहशत

शहरातील सयाजीराव हायस्‍कूलसमोर कोयता गँगमधील काही गुंडांनी हातात कोयते नाचवत गोंधळ घातला. हाकेच्‍या अंतरावर असणार्‍या शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी धाव घेत २ जणांना कह्यात घेतले.

पुणे येथे ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – बजरंग दल

शाहरूख खानचा वादाच्‍या भोवर्‍यात अडकलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे; परंतु हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्‍याची चेतावणी दिली आहे.