‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच गवत काढण्यात आले आणि काटेरी झाडे तोडण्यात आली.श्री भवानीदेवीच्या मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर गड भ्रमंती करून सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेण्यात आली.

वाहनचालकांवर पाणी भरलेल्या पिशव्या फोडल्याने अपघातांची शक्यता !

असे करणार्‍या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?

मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांना मांस खायला देणार्‍या महिलांवर गुन्हा नोंद !

हिंदूंच्या मंदिरासमोर कुत्र्यांना मांस खायला घालणार्‍या विकृतांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

नाशिक येथे कृत्रिमरित्या आंबे पिकवणार्‍यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम !

अनैसर्गिकरित्या पिकलेले आंबे खाणे आरोग्यास चांगले नसते. कच्चे आंबे वाहतुकीच्या दृष्टीने पाठवणे योग्य असते. आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातो. 

उन्हाळ्याच्या प्रारंभीच सोलापूर येथील १९ गावांत टँकरने पाणीपुरवठा !

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रशासनाने प्रबोधन करणे आवश्यक !

आदिवासी शाळांतील मुलांचे दूध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोट्यवधी रुपयांचा अपहार !

राज्यातील आदिवासी शाळांमध्ये देण्यात येणार्‍या दुधात ८० कोटींचा आणि सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या ‘पोषण आहारा’मध्ये २५० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप ‘शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

निवडणूक कामकाज करणार्‍यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवा ! – जिल्हाधिकारी

आगामी लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय ? – बापू ठाणगे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून चालू झाले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी ‘भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी काय संबंध ?’, असा प्रश्न करत जिल्हाधिकार्‍यांना यासंबंधी निवेदन दिले आहे.

उष्णता निर्देशांकाचा आकडा घोषित करण्याची पद्धत अद्याप चालू नाही !

उष्णता निर्देशांक ३५ अंश सेल्सिअसपेक्षा न्यून, ३५ ते ४५ अंश, ४६ ते ५५ अंश आणि ५५ अंशांच्या पुढे अशा चार श्रेणी आहेत.

आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्ती अभ्यास आणि संशोधन आवश्यक ! – डॉ. जी.बी. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे जाणकार

मूर्तीशास्त्र हा दुर्लक्षित विषय असून विद्यापिठाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मूर्तीचा खोलवर जाऊन अभ्यास केला, तरच आपला जाज्वल्य इतिहास समोर येणार आहे.